

riteish deshmukh
esakal
मराठीसोबतच बॉलिवूड गाजवणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. तो अनेकदा सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसतो. काही दिवसांपूर्वी रितेशचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. रितेश एका रेस्टॉरंटमधून बाहेर येतो. त्याला तिथे असलेल्या एका मुलाला पैसे द्यायचे असतात मात्र त्याच्याकडे पैसे नसतात तेव्हा तो एका पापराझीकडून १०० रुपये घेतो. त्यानंतर रितेशने त्या पापाराझीचा सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. आता एका मुलाखतीत रितेशने तेव्हा नेमकं काय घडलेलं याबद्दल सांगितलय.