
शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध राज कपूर यांच्याबद्दल असं म्हंटल जातं की भविष्यात प्रेक्षकांना कोणत्या प्रकारचा सिनेमा पहायला आवडेल हे त्यांना तेव्हा कळलं होतं. त्यांच्या या विचारांची उत्पत्ती 'बॉबी' आणि 'मेरा नाम जोकर' सारखे चित्रपट होते. त्यांच्याकडे चित्रपटांसाठी ज्ञानाचा प्रचंड साठा होता. राज कपूर यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून उत्कृष्ट काम केलं. राज कपूर हे असं नाव आहे ज्याने अनेक लोकांचं नशीब देखील बदललं. मात्र एक अभिनेत्री होती जी त्यांचा प्रचंड राग राग करायची.