
Singer Asha Bhosale: मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय मराठी गायिका आशा भोसले यांच्या आवाजाची जादू आजही श्रोत्यांच्या मनावर कायम आहे. ९० वर्षाच्या आशा अजूनही गाण्याचे कार्यक्रम करताना दिसतात. पद्मविभूषण आशा भोसले यांच्या करिअरची गाडी कायम वर वरच जात राहिली मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. आशा भोसले यांनी चक्क गरोदर असताना आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांनी स्वतः त्यांचं आत्मचरित्र 'आशा भोसले: अ लाईफ इन म्युझिक’ मध्ये या गोष्टीबद्दल खुलासा केलाय.