

tejashri pradhan new house
ESAKAL
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातलीये. तिने आपल्या करिअरमध्ये कधीही मागे वळून पाहिलं नाही. तेजश्री मूळची डोंबिवलीची आहे. तिने तिचं बालपण डोंबिवलीत घालवलंय. अभिनेत्री झाल्यानंतर तिने तिचं स्वप्न सांगितलं होतं की तिला स्वतःचं घर घ्यायचं होतं. तिने ते घर घेतलं देखील मात्र आता त्या घरातूनदेखील ती दुसरीकडे शिफ्ट झालीये. यामागचं कारणही तिने सांगितलं.