

PURNA AAI
ESAKAL
स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' गेले कित्येक वर्ष टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातील सायली आणि अर्जुन याची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. ४डिसेंबर रोजी या मालिकेचे १००० भाग पूर्ण होणार आहेत. सध्या मालिकेत सायलीचा भूतकाळ शोधण्याचं काम सुरू आहे. लवकरच प्रतिमा आणि रविराज यांच्या अपघाताचा आणि महिपतशी काय संबंध आहे हे शोधण्यात सायली आणि अर्जुन व्यग्र आहेत. पुढील खुलासा लवकरच होईल असं सांगण्यात येतंय. मात्र काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील महत्वाचं पात्र पुर्णा आजी साकारणाऱ्या कलाकार ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. मात्र त्यांच्या अंतिम कार्याला 'ठरलं तर मग' च्या सेटवरील कुणीही गेलं नव्हतं. आता मालिकेतील अश्विनने त्याचं कारण सांगितलं आहे.