
VICKY KAUSHAL KATRINA KAIF
ESAKAL
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी कतरीना कैफ आणि विकी कौशल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी तीन वर्षांपूर्वी राजस्थानमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केली होती. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झालेली. लग्नाच्या तीन वर्षानंतर कतरिना प्रेग्नन्ट आहे. कौशल कुटुंब आनंदी आहे. तर आपल्याला थोडी भीतीही असल्याची भावना विकी कौशलचा भाऊ आणि अभिनेता सनी कौशल याने व्यक्त केली होती. मात्र चाहते कतरिना आणि विकीच्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना मुलगा होणार की मुलगी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशातच आता एका सेलिब्रिटी ज्योतिषाने त्यांना मुलगा होणार की मुलगी याचं गुपित उलगडलं आहे