
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हिंदूंच्या हत्येचं उत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' ही कारवाई केली. ७ मे रोजी पाकिस्तानच्या ९ दहशतवादी चौक्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या एअर स्ट्राईकवर बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्ध सुरू आहे. सीमेवर प्रचंड तणाव आहे. अशात लोकप्रिय मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी ऑपरेशन सिंदुरवर आपलं मत मांडलं आहे.