

Yash Toxic movie Twitter review and audience reactions
ESAKAL
गेले काही महिने साउथ सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत होता. त्याचं कारण होतं या चित्रपटातील गाणी आणि काही अडल्ट सीन. त्यामुळे या चित्रपटावर आणि कलाकारांना ट्रोल करण्यात आलं. आवाज २६ ऑगस्ट रोजी अखेर यशचा 'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शित झालाय. तो चित्रपटात गँगस्टर दाखवण्यात आलाय. त्यामुळे खून, रक्तपात तर आहेच सोबतच अडल्ट सीनदेखील खूप आहेत. या चित्रपटातून यश तब्बल ४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतलाय. त्यामुळे आता प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सेन्सॉर बोर्डाकडून ‘A’ प्रमाणपत्र मिळालेला हा चित्रपट कसा आहे पाहूया.