

yed lagala premacha entry
esakal
गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर काही मालिकांमध्ये नवीन कलाकारांची एंट्री झाली. अशाच एका गाजलेल्या कलाकाराची स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री होणार आहे. ही मालिका आहे प्रेक्षकांची आवडती 'येड लागलं प्रेमाचं'. सध्या या मालिकेत राया पोलीस बनलेला दाखवण्यात आलाय.आता राया आणि मंजिरीच्या आयुष्यात नवीन वादळ येणार आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची आणि नृत्यांगनेची एंट्री होणार आहे. ही अभिनेत्री आहे मेघा घाडगे. या मालिकेतून ती तब्बल २० वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.