
ajey movie poster
esakal
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित 'अजेय' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटगृहांबाहेर पहिला शो सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. चित्रपटगृहे 'जय श्रीराम' आणि 'योगी-योगी' च्या घोषणांनी दुमदुमून गेली होती. लोकांचा हा उत्साह बघता, मुख्यमंत्री योगी यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा जीवनसंघर्ष मोठ्या पडद्यावर पाहणे, त्यांच्या समर्थकांसाठी एखाद्या सणावारापेक्षा कमी नव्हते.