'जीव माझा गुंतला' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण. योगिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसापूर्वी योगिताने सुरज चव्हाणसोबत झापुक झुपूक गाण्यावर डान्स केला होता. सोशल मीडियावर त्या डान्सला भरपूर पसंती मिळाली. दरम्यान आता योगिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका नवा व्हिडिओ शेअर केला आहे.