बिग बॉस फेम योगिता चव्हाण हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून योगिता घराघरात पोहचली. तिच्या अभिनयाने आणि साधेपणाने सर्वांना आपलसं केलं. दरम्यान योगिता नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती नेहमीच तिच्या डान्सचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.