अभिनेत्री झरिन खान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सध्या चित्रपटात कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचं फिल्मी करिअर काही खास नाहीय. परंतु ती नेहमी चर्चेत असते. दरम्यान अशातच आता झरिन खान हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती पापराझीवर भडकताना दिसत आहे.