

zee marathi actors raksha bandhan
esakal
रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि आयुष्यभराच्या सोबतीचा उत्सव आहे. बालपणी रक्षाबंधन म्हणजे भावंडांची गडबड, घरभरलेला आनंद, भेटवस्तू, मिठाई आणि दिवसभराची धमाल. काळ पुढे सरकतो, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो, पण या सणाच्या निमित्ताने बालपणीच्या त्या सुंदर आठवणी पुन्हा मनात ताज्या होतात. भावंडांसोबत घालवलेले हे क्षण, केलेली मस्ती, भांडणं आणि एकत्र साजरे केलेले सण मोठं झाल्यावर अधिकच खास वाटू लागतात. याच रक्षाबंधनाच्या आठवणी सांगत आहेत झी मराठीचे कलाकार.