

mahima mhatre
esakal
TULA JAPNAR AAHE SERIAL: छोट्या पडद्यावरील कलाकार हे प्रेक्षकांचे आवडते असतात. हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात याकडेही प्रेक्षकांचं लक्ष असतं. कलाकारांच्या चुकाही चाहते वेळोवेळी दाखवत असतात. अशाच एका अभिनेत्रीची आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. ही अभिनेत्री आहे झी मराठीची लोकप्रिय नायिका महिमा म्हात्रे. महिमा सध्या 'तुला जपणार आहे' या मालिकेत मीराच्या भूमिकेत दिसतेय. मात्र मीराच्या नाकावरच्या पट्टीमुळे पुन्हा एकदा चाहते तिला प्रश्न विचारत आहेत.