

ZEE MARATHI NEW SERIAL
esakal
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकांमधील काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर काहींकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अशातच काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीने देखील दोन नव्या मालिकांची घोषणा केली. यात 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आणि 'वचन दिले तू मला' या मालिकांचा समावेश आहे. यातील एक मालिका १५ डिसेम्बरपासून सुरू होतेय. तर दुसरीकडे कलर्स वाहिनीवर 'बिग बॉस मराठी ६' ची घोषणा करण्यात आली. अशातच आता स्टार प्रवाह आणि कलर्सला टक्कर द्यायला झी मराठीने देखील नव्या मालिकेची घोषणा केलीये.