

ZEE MARATHI
ESAKAL
सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेगवेगळे विषय यानिमित्ताने दाखवले जातायत. नवनवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. असं असलं तरी जुन्या मालिकांची जादू प्रेक्षकांच्या मनात तशीच आहे. जुन्या मालिका या जुनं ते सोनं या उक्तीला सार्थ ठरतात. त्यामुळे आजही अशा अनेक मराठी मालिका आहेत ज्या प्रेक्षकांच्या मनात कोरलेल्या आहेत. आता झी मराठीवरील अशाच गाजलेल्या दोन मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर करत याबद्दल माहिती दिलीये.