तुमच्याच आवडीच्या मालिकेला पुरस्कार देऊन टाकायचे ना! 'तारिणी' मालिकेला डावललं; ‘झी मराठीवर प्रेक्षक संतापले, म्हणतात-

Tarini Serial Fans Question Awards Selection As Veen Doghatli Hi Tutena And Sanai Chaughade Receive Awards: नुकतेच झी मराठीचा पुरस्कार सोहळा पार पडला. मात्र यात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केलाय. हा सोहळा त्यांना मुळीच आवडलेला नाही.
zee marathi awards 2026 audience angry reaction

zee marathi awards 2026 audience angry reaction

esakal

Updated on: 

नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा २०२६ पार पडला. दरवर्षीप्रमाणे प्रेक्षकांनी या सोहळ्याला उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षीचा पुरस्कार सोहळा जरा वेगळा ठरला. कलाकार वेगळ्या रूपात दिसले. त्यांची भावनिक बाजू प्रेक्षकांसमोर आली. पुरस्कार म्हटलं की कुणाला मिळणार आणि कुणाला नाही. मात्र यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्यावर प्रेक्षक नाराज आहेत. यापूर्वी 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मधील ऐश्वर्या नारकर यांना वगळून 'तुला शिकवीन चांगलाच धडा'मधील कविता लाड यांना पुरस्कार मिळाल्याने प्रेक्षकांनी झी मराठीची कानउघडणी केली होती. आता पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार घडला आहे. झी मराठीची नंबर १ मालिका 'तारिणी' ला पुरस्कार न मिळाल्याने प्रेक्षक संतापले आहेत.

Loading content, please wait...