

zee marathi serial timing change
ESAKAL
झी मराठीवर नवनव्या मालिका येत आहेत. टीआरपीमध्ये टॉप येण्यासाठी वाहिन्या सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतायत. अशातच झी मराठीने नव्या मालिकांची घोषणा केली होती. आता या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे आता जुन्या मालिकांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलाय. नुकताच याबद्दलचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. झी मराठीवर 'दीप ज्योती' ही मालिका नव्याने सुरू होतेय. त्यामुळेच झी मराठीच्या दोन मालिकांची वेळ बदलण्यात आलीये.