

zee marathi serial off air
ESAKAL
गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकांनी जुन्या मालिकांची जागा घेतली. काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रत्येक वाहिनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन विषयांवरील मालिका आणत आहे.अशातच झी मराठीने दोन नव्या मालिकांची घोषणा केली. पहिली 'इच्छाधारी नागीण' आणि दुसरी 'येतेच आता मी नांदायला'. या दोन्ही मालिकांचे नवे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. त्यातील 'येतेच आता मी नांदायला' या मालिकेचीदेखील जोरदार चर्चा आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झालाय. ज्यात मालिकेची वेळ सांगण्यात आलीये. त्यामुळे आता दुसरी मालिका निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय.