

tarini new entry
esakal
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. या मालिकांमध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट येत असतात. झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांच्या मालिकांमध्ये टीआरपीसाठी मोठी लढत पाहायला मिळतेय. झी मराठीदेखील आता दर्जेदार मालिका देत टीआरपी यादीत आपलं स्थान पक्क करताना दिसतेय. टीआरपी यादीत असंच आपलं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारिणी'. 'तारिणी' सध्या टीआरपी यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. अशातच आता मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे.