
Marathi Entertainment News : सध्या कमी टीआरपीमुळे असो किंवा कथानकाच्या कारणामुळे निर्माते मालिका ऑफ एअर करत आहेत. झी मराठी वाहिनीने गेल्या काही महिन्यात अनेक मालिका बंद केल्या आहेत आणि अनेक नवीन मालिका आणि शो सुरु केले आहेत. नुकतीच देवमाणूस आणि कमळी या दोन नव्या मालिकांची घोषणा केली. तर प्रेक्षकांची लाडकी नवरी मिळे हिटलरला ही मालिका ऑफ एअर झाली. पण तुम्हाला माहितीये का ? या पाठोपाठ झी मराठीची आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय.