
छोट्या पडद्यावर गेल्या महिन्याभरात तब्बल पाच नवीन मालिकांची घोषणा करण्यात आली. त्यातील २ कार्यक्रम स्टार प्रवाहवर होते तर ३ कार्यक्रम झी मराठीवरचे होते. झी मराठी आपला टीआरपी वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतंय. झी मराठीकडे तेजश्री प्रधान हा हुकुमाचा एक्का तर आहेच सोबतच शिवानी सोनार एका वेगळ्या ढंगात वेगळ्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यांच्या पाठोपाठ झी मराठीने आणखी एका कार्यक्रमाची घोषणा केलीये. झी मराठीवरील गाजलेला शो आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जो पाहून गृहिणी खुश होणार आहेत.