

ZEE MARATHI
ESAKAL
झी मराठी वाहिनी प्रेक्षकांची आवडती वाहिनी आहे. या वाहिनीने अनेक दमदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. कुटुंबाची कथा असेल किंवा भयकथा प्रत्येक विषयाला अनुसरून एक वेगळा अनुभव या मालिकांमधून प्रेक्षकांना मिळत होता. मात्र आता काही वर्षांपासून झी मराठीचे प्रेक्षक स्टार प्रवाहकडे वळले आहेत. गेल्या काही महिन्यात झी मराठीच्या अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर काही मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या. आता आणखी एका मालिकेची वेळ बदलल्याने प्रेक्षक चकीत झाले आहेत.