

TULA JAPNAR AAHE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. यातील कलाकारही प्रेक्षकांना त्यांच्या घरातलेच वाटतात. मालिकेतील एखादा कलाकार जरी कमी झाला तरी प्रेक्षकांना त्याची उणीव जाणवते. अशीच झी मराठीची एक अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दिसत नव्हती. त्यावरून मुख्य भिनेत्रीने मालिका सोडल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र प्रेक्षकांनी त्याच अभिनेत्रीला परत आणायची मागणी केली होती. आमच्या लाडक्या अभिनेत्रीला पुन्हा मालिकेत घेऊन या…अशी विनंती गेल्या आठवड्याभरापासून चाहते कमेंट्स सेक्शनमध्ये करत होते. अखेर त्यांची ती इच्छा पूर्ण झालीये. मालिकेत पुन्हा एकदा लोकप्रिय अभिनेत्रीची दमदार एंट्री झालीये.