TULA JAPNAR AAHE ACTRESS MAHIMA
esakal
TULA JAPNAR AAHE ACTRESS MAHIMA MHATRE INJURY: मराठी मनोरंजनविश्वात सध्या टीआरपीसाठी मालिकांमध्ये चढाओढ सुरु आहे. मालिकांमध्ये विविध ट्विस्ट आणले जाताय. काही अॅक्शन सीक्वेन्स सुद्धा मालिकांमध्ये पहायला मिळतात. कधी कधी मालिकांमध्ये १२ तासांहून अधिक वेळ शुटिंग असतं. तरीही कलाकार मनापासून काम करतात. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुला जपणार आहे हे गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. रात्री उशीर मालिका असूनही याचा टीआरपी चांगला आहे. या मालिकेत अभिनेत्री महिमा म्हात्रे मुख्य भूमिकेत आहेत.