TULA JAPNAR AAHE SERIAL
ESAKAL
झी मराठीवरील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा चर्चा रंगत होत्या. दरम्यान आता कोणती मालिका निरोप घेणार हे समोर आलं असून 'तुला जपणार आहे' ही मालिका लवकरच संपणार आहे. नुकताच या मालिकेच्या शेवटचा दिवसाचं शुटिंग पार पडलं. मालिकेच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ Iris प्रोडक्शनच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये सर्व कलाकार आणि मालिकेची टीम 'तुला जपणार आहे, समाप्त' असं लिहलेल्या केक कापताना दिसत आहे.