
छोट्या पडद्यावर आतापर्यंत अनेक प्रकारचे रिॲलिटी शो तसेच अन्य कार्यक्रम आलेले आहेत. त्यातील काही कार्यक्रमांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. आता झी टीव्हीवर ‘छोरियां चले गाव’ हा नवा रिॲलिटी शो लवकरच येणार आहे. या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण जीवनातील नेमका फरक काय असतो. ग्रामीण जीवनशैली तसेच शहरी जीवनशैली कशा पद्धतीची असते याचा उलगडा होणार आहे. या शोमध्ये काही शहरात वाढलेल्या आधुनिक तरुणींना एका ग्रामीण भागात पाठविण्यात येणार आहे, जिथे त्या एकमेकींसोबत राहून गावातलं खरं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा शो मराठी रिॲलिटी शो ‘जाऊबाई गावात’ यावर आधारित आहे.