

vallari viraj comeback
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकांसाठी काही जुन्या मालिकांनी देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीने देखील दोन नव्या मालिकांची घोषणा केली. यात 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' आणि 'वचन दिले तू मला' या मालिकांचा समावेश आहे. यातील एक मालिका १५ डिसेम्बरपासून सुरू होतेय. तर दुसरीकडे कलर्स वाहिनीवर 'बिग बॉस मराठी ६' ची घोषणा करण्यात आली. आता झी मराठीने देखील त्यांच्या नव्या मालिकांची घोषणा केलीये. ज्यात झी मराठीची गाजलेली नायिका पुन्हा एकदा दिसणार आहे.