

PREMALA CONDITIONS APPLY
ESAKAL
प्रेम, महत्त्वाकांक्षा, सत्तासंबंध आणि आत्मसन्मान यांचा वेध घेणाऱ्या ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ या नव्या ओरिजिनल सीरिजची घोषणा मराठी ZEE5ने केली असून अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि जान्हवी उदय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजचे दिग्दर्शन गौरव पत्की यांनी केले आहे. कॉर्पोरेट जगतातील नियम आणि मनातील भावनांमध्ये अडकलेल्या दोन सहकाऱ्यांची ही भावनिक कथा असून कामाच्या ठिकाणी फुलणारे प्रेम, त्यासोबत येणारी गुंतागुंत आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष यांची प्रभावी मांडणी या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. ही सीरिज 24 जून 2026 रोजी मराठी ZEE5वर प्रदर्शित होणार आहे.