मी त्याच्यासाठी सगळं केलं तरीही त्याने... झीनत अमान यांनी सांगितली त्यांची चूक; म्हणाल्या- १२ वर्षाच्या संसारात कधीही मला...

Zeenat Aman Marriage Story | Actress Reveals Husband's Infidelity And Painful Married Life: सिनेमांमधून प्रेक्षकांना प्रेमाची व्याख्या शिकवणाऱ्या झीनत अमान यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यात मात्र प्रेम मिळालंच नाही. आता त्यांनी त्यांची चूक सांगितली आहे.
zeenat aman

zeenat aman

esakal

Updated on: 

बॉलिवूडच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री झीनत अमान त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिल्या. १९ नोव्हेंबर १९५१ रोजी मुंबईत जन्मलेल्या झीनत यांचे वडील मुस्लिम होते तर आई हिंदू होती. झीनत यांनी बालपणीच त्यांच्या आई- वडिलांचा घटस्फोट पाहिला. मात्र त्यांना स्वतःच्या लग्नाच्या लग्नातही अनेक संकटांचा सामना करावा लागला. लग्नाच्या पहिल्याच वर्षी आपण फसवले गेलोय हे त्यांच्या लक्षात आलं. मात्र तरीही त्यांनी १२ वर्ष संसार केला. एका मुलाखतीत त्यांनी नवऱ्याला आजारपणात दिलेली साथ ते त्यांची फसवणूक याबद्दल खुलासा केला आहे.

Loading content, please wait...