
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. यातील काही सिनेमे हे काल्पनिक आहेत तर काही खऱ्या व्यक्तींवर. अगदी राजघराण्याशी संबंधितही अनेक सिनेमे निघाले आहेत. पण तुम्हाला माहितीये अभिनेत्री करिष्मा कपूरने 2000 च्या दशकात केलेला हा सिनेमा एका बॉलिवूड अभिनेत्रीवर आधारित आहे. जिने मारवाडच्या महाराजांशी लग्न केलं पण त्यांच्याबरोबरच विमान अपघातात तिचा बळी गेला तर काही वर्षांनी त्यांच्या मुलाचीही हत्या करण्यात आली.