दीड वर्षात सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या १० लाख नोकऱ्या वाढणार

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नव्या संधी निर्माण होतायेत; 'टीमलीज डिजिटल' या नोकरभरती करणाऱ्या कंपनीने याबाबतची अभ्यास केला आहे
software engineer recruitment
software engineer recruitment Esakal

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्याने नोकऱ्या जाणार की काय अशी भीती एकीकडे वाटत असताना तसेच आय टी क्षेत्रातही सध्या बेरोजगारीचा आलेख उंचावत असताना येत्या एक ते दीड वर्षात नवे तंत्रज्ञान आणि कौशल्ये असणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सची संख्या वाढणार असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच काळासोबत बदलणारी नवी कौशल्ये आत्मसाद करणाऱ्या इंजिनियर्सना चांगल्या संधी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. या अभ्यासानुसार पुढील दीड वर्षात काळासोबत येणारी नवी कौशल्य आत्मसाद करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सची मागणी ९ ते १० लाखांपर्यंत असू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com