

Balanced Advantage Fund Benefits
esakal
‘सकाळ मनी’च्या दर महिन्याच्या अंकात शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकिंग, टॅक्सेशन, रिअल इस्टेट, सोने-चांदी, क्रिप्टो करन्सी, आर्थिक नियोजन, निवृत्ती नियोजन आदी विविध विषयांवर तज्ज्ञांचे लेख, मुलाखती प्रसिद्ध होत असतात. त्या पार्श्वभूमीवर आता वाचक वा गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘सकाळ मनी’कडे आलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे पुढील अंकांमध्ये प्रसिद्ध केली जातील. यासंदर्भात वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. वाचकांनी आपले प्रश्न
या मेल आयडीवर थोडक्यात पाठवावेत. आपले प्रश्न संक्षिप्त आणि प्रातिनिधिक स्वरूपात असावेत.
प्रश्न १ : बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड म्हणजे काय?
उत्तर : बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड हा हायब्रिड म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. या फंडामध्ये कर्जरोखे (डेट) आणि शेअर (इक्विटी) या दोन्हींमध्ये गुंतवणूक केली जाते. या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारातील तेजी-मंदीच्या परिस्थितीनुसार कर्जरोखे आणि शेअरमधील गुंतवणुकीचे प्रमाण बदलत राहते. याचा मुख्य उद्देश परतावा आणि जोखीम यांचा समतोल साधणे हा असतो. इक्विटी फंडांच्या तुलनेत हा फंड तुलनेने कमी जोखमीचा मानला जातो.