Premium|Personal Finance Management : गुंतवणुकीच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी बॅलन्सशीट समजून घेणे का आवश्यक आहे?

Personal Finance Management : बदलत्या आर्थिक जगात महिलांनी स्वतःची 'बॅलन्सशीट' समजून घेणे ही आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. संपत्ती आणि देणी यांचा आरसा असलेली ही पद्धत केवळ व्यवसायच नव्हे, तर कौटुंबिक आर्थिक सुरक्षिततेसाठीही अत्यंत महत्त्वाची ठरते.
Personal Finance Management

Personal Finance Management

esakal

Updated on

सारिका चोरडिया - esteemsolutions2003@gmail.com

आजच्या वेगवान आणि बदलत्या आर्थिक जगात महिलांची भूमिका केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्या कमावतात, गुंतवणूक करतात, व्यवसाय सांभाळतात आणि कुटुंबाचे आर्थिक निर्णयही आत्मविश्वासाने घेतात. मात्र, एक मूलभूत प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात अनुत्तरित राहतो... तो म्हणजे आपली खरी आर्थिक स्थिती आपल्याला नेमकी कितपत माहिती आहे?... याचे उत्तर शोधण्यासाठी ‘बॅलन्सशीट’ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण बॅलन्सशीट ही केवळ आकड्यांची मांडणी नसून, ती आपल्या आर्थिक आयुष्याचा स्पष्ट आरसा आहे.

आपण आपल्या आर्थिक स्थितीचा स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ आढावा घेतो का? अनेक वेळा उत्पन्न चांगले असते; पण कर्जही मोठ्या प्रमाणावर असते. बचत असते; पण ती तरल स्वरूपात नसते. अशा परिस्थितीत आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो. म्हणूनच ‘बॅलन्सशीट’ समजणे म्हणजे आर्थिक आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे. हा शब्द ऐकला, की अनेकांना तो अवघड वाटतो; पण प्रत्यक्षात ती एका ठराविक दिवशीची आर्थिक स्थिती दर्शवणारी साधी आणि प्रभावी पद्धत आहे. ती आपल्याला सांगते, आपल्याकडे काय आहे? आपण कोणाला काय देणे लागतो? आणि आपल्या हातात किती उरते?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com