

Safest countries in WW3
esakal
युक्रेन युद्ध, गाझा पट्टीतील संघर्ष यांसह जगाच्या काही वर्षांमध्ये अनेक भागांमध्ये तणाव वाढला आहे. त्यातून तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो, अशी भीती वारंवार व्यक्त करण्यात येते. या पार्श्वभूमीवर, तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडालाच, तर जगातील कोणत्या भागाला किती धोका असू शकेल, असा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये न्यूझीलंड, आइसलँड यांसारखे देश अन्य देशांच्या तुलनेत सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
जगात कधी तिसरे महायुद्ध भडकले, तर पृथ्वीवर नेमके कोणते ठिकाण सुरक्षित राहील, अशी शंका जगभरात अनेक देशांमधील राजनैतिक तणावात निर्माण होणे साहजिक आहे. विशेषतः अण्वस्त्रांच्या या युगात जगभरातील संघर्षांपासून सर्वाधिक सुरक्षितता कोणत्या प्रदेशात मिळू शकते, याचा शोध संशोधक, विश्लेषक आणि धोक्याबाबत अंदाज घेणारे अभ्यासक हे सतत घेत असतात.