
जगदीप एस. छोकर
परराष्ट्र धोरण हा देशाच्या कारभारातील प्रमुख घटकांपैकी एक आहे आणि या कारणास्तव देशाच्या सरकारमधील सर्वोच्च स्तरावर याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शिवाय, भारत हा खूप मोठा देश आहे आणि त्यामुळे जागतिक घडामोडींमध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असू शकते.
त्यामुळे जग भारताच्या परराष्ट्र धोरणाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे. त्यामुळे आपण स्वत: याबाबत अत्यंत गांभीर्याने वागणे अत्यावश्यक आहे. याचा समाजावर दीर्घकाळ परिणाम होत असल्याने परराष्ट्र धोरणाबाबत राष्ट्रीय सहमती आवश्यक आहे.
अनेक वर्षांपूर्वी एक काळ असा होता, जेव्हा भारताचे परराष्ट्र धोरण हा राष्ट्रीय सहमतीचा विषय होता. हा तो काळ होता जेव्हा भारत हा अलिप्ततावादी देशांच्या आघाडीचा (नॉन-अलाइनमेंट मुव्हमेंट-नाम) संस्थापक आणि त्या देशांच्या नेत्यांपैकी एक होता.