
Arvind Kejriwal Strategy Against BJp Delhi Assembly Election 2025
सुनील चावके
हरियाना आणि महाराष्ट्रामध्ये विजयांची हॅटट्रिक साजरी करणाऱ्या भाजपची २०१४ पासून दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’विरुद्ध डाळ शिजू शकलेली नाही. दिल्लीमध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा जिंकताना तथाकथित ईव्हीएम गैरव्यवहारांना पुरुन उरणे ही ‘आप’ची जमेची बाजू ठरली आहे. तरीही ‘इंडिया’ आघाडीतील इतर मित्रपक्षांप्रमाणे ‘आप’ गाफील नाही.