
डॉ. सचिन वारघडे
समन्यायी पाणीवाटप करायचे म्हणजे नेमके काय करायचे, हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. कोणाला किती पाणी, कशासाठी, कधी, कोठे, कसे, किती काळासाठी, किती खर्चात, असे अनेक क्लिष्ट प्रश्न निर्माण होतात. उपलब्ध असलेल्या पाण्यात नवीन मागणी, विशेषतः वाढत्या शहरी वस्त्या व उद्योग-व्यवसाय यांची गरज कशी भागवायची, कोणाचे पाणी कमी करायचे, तसे केल्यास नुकसान कसे भरून काढता येईल, असे नवीन प्रश्नही निर्माण होत आहेत.