Premium|Sumitra Bhave National Award Movies : 'बाधा' चित्रपटासाठी जेव्हा सुमित्रा भावेंनी फोन केला; डॉ. मिलिंद शिंदे यांनी जागवल्या जुन्या आठवणी

Sumitra Bhave and Sunil Sukthankar Films : सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्गज दिग्दर्शक द्वयींच्या 'बाधा' चित्रपटातील भूमिकेनिमित्त आलेला अनुभव आणि त्यांच्या संयत कार्यपद्धतीचा वेध घेणारा डॉ. मिलिंद शिंदे यांचा हा अत्यंत प्रेरक आणि भावूक लेख.
Sumitra Bhave National Award Movies

Sumitra Bhave National Award Movies

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

खरं तर हे त्या दोघांचं मोठेपण होतं... अगदीच नवख्या एक-दोन सिनेमे केलेल्या नटाला स्वतःहून फोन करणं. नकार देण्याची काय बिशाद...?

त्यांचे आधीचे सगळं सिनेमे नजरेसमोरून सरकू लागले. दोघी... वास्तुपुरुष... मानदंड ठरलेले सिनेमे... प्राथमिक बोलणी झाल्यावर... जिथं आपल्याला चित्रीकरण करायचं आहे... तिथं जाण्याचं.. त्या वातावरणात तीन-चार दिवस राहण्याचं ठरलं.

सुमित्रा भावे बोलतायेत... बोल त्यांच्याशी.

सुनील सुकथनकरनं फोन सुमित्रा भावेंकडे दिला. आम्ही ‘बाधा’ नावाचा सिनेमा करतोय. मी आणि सुनील त्याचं दिग्दर्शन करतोय. त्या सिनेमात एक भगत (देवऋषी) नावाचं छोटसं पण महत्त्वाचं पात्र आहे. ते कराल का..? सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर या द्वयींना कोण नाही म्हणणार..?

एकाहून एक उत्तमोत्तम सिनेमे करणाऱ्या या दोघांसोबत काम करण्यासाठी तेव्हाही कित्येक कलावंत- तंत्रज्ञ उत्सुक होते. आताही आहेत. दुर्दैवाने सुमित्रा भावे आपल्यात हयात नाहीत. सुनीलसोबतही काम करण्यास खूप कलावंत उत्सुक आहेत...

सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या जोडीबद्दल काही गोष्टी मनात कायम घर करून राहिल्या आहेत. दिल्लीला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होता. तो आता इफ्फी नावाने गोव्याला स्थलांतरित झाला. दिल्लीला सिटी फोर्ट या अतिशय मोठ्या प्रांगणात तिथल्या चित्रपटगृहात हा चित्रपट महोत्सव रंगत असे. गोष्ट त्या वेळेसची..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com