Premium|Sahyadri Devrai Mission : कुणाचेही ऐकू नका, झाड कापू देऊ नका

Environmental protection in India : अभिनेते सयाजी शिंदे यांनी बेसुमार वृक्षतोड, प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि देशी झाडांच्या महत्त्वावर रोखठोक मते मांडत, प्रत्येकाने आपल्या वयाइतकी झाडे लावून पर्यावरण वाचवण्याच्या चळवळीत सामील होण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
Sahyadri Devrai Mission

Sahyadri Devrai Mission

esakal

Updated on

अलीकडे विकासकामे झाडांच्या मुळावर येत आहेत. बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर परिणाम होऊन शहरे रोगट बनली आहेत. ती सुधारण्यापलीकडे गेली आहेत. झाडे वाचवण्यासाठी ठोस कायदा अस्तित्वात नसल्यामुळे बांधकाम प्रकल्पासाठी ती सहज कापली जातात.

देव सर्वत्र आहे; पण झाडे नसतील तर आपण जगू शकणार नाही. आपल्या पर्यावरणाचा समतोल आधीच बिघडलेला आहे. जिकडे पाहावे तिकडे उजाड रानमाळे, उजाड प्रदेश अशी परिस्थिती असताना कुंभमेळा किंवा इतर कोणतेही कारण सांगून झाडे तोडणे चुकीचे आहे, अशी माझी भूमिका आहे. रस्त्याच्या बाजूची विविध प्रकारची ही झाडे वाचू शकतात याची मला खात्री आहे. प्रशासन गोड बोलून सामान्यांना फसवते, हे अनुभवाने माझ्या लक्षात आले आहे. मात्र हे गोड बोलणारे, खोटे वागणारे लोकही आपल्यापैकी कुणीतरी आहेत. मला कधी कधी वाटते, त्यांच्यात माणुसकी शिल्लक राहिलेली नाही का? त्यांचे काम वरून सांगितलेले ऐकणे एवढेच उरले आहे. आई आणि झाडापलीकडे काही उरत नाही. बाकी सगळा मनाचा खेळ आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com