
+जेमी मिलर. वय तेरा. ब्रिटनमधल्या एका मध्यमवर्गीय घरातला धाकटा मुलगा. वडील प्लंबर आणि आई गृहिणी. किशोरावस्थेच्या उंबऱ्यावर जेमतेम उभ्या असणाऱ्या जेमीवर त्याच्या वर्गमैत्रिणीच्या, किटीच्या खुनाचा आरोप आहे.
एका सकाळी पोलिसांची एक तुकडी घराचं दार अक्षरशः फोडून जेमीच्या घरात शिरते...