

Tesla Optimus robot price and features India
esakal
ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com
कल्पना करा, की तुम्ही सकाळी झोपेतून उठता आणि तुमच्या रोबोने रात्रीची खरकटी भांडी घासून ठेवली आहेत. तो किचनमध्ये तुमच्या आवडीची कॉफी बनवत आहे. तुम्ही ऑफिसमधून थकून-भागून घरी परतता, तेव्हा तुम्हाला घर आरशासारखे स्वच्छ दिसते... धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घातलेल्या असतात... हे चित्र आता फक्त स्वप्न राहिलेले नाही, तर ते प्रत्यक्षात येत आहे.
मित्रहो, जरा कल्पना करा. तुमच्या घरात एक नवीन नोकर रुजू होणार आहे. हा असा नोकर आहे जो कधीही थकत नाही, ज्याला कधीही विरंगुळ्यासाठी सुट्टी लागत नाही आणि जो कधीच तक्रार करत नाही, की आज कामाचा डोंगर किती मोठा आहे. हा नोकर न थकता २४ तास तुमच्या सेवेसाठी सज्ज असेल; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा नोकर हाडामांसाचा माणूस नाही. हा एक प्रगत ‘रोबो’ आहे... हे ऐकायला कदाचित एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील कल्पनेसारखे वाटेल; पण ही कल्पना नाही तर २०२६ची ठोस वास्तविकता आहे. आज आपण अशा उंबरठ्यावर उभे आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या वैयक्तिक जीवनाचा आणि घरातील कामांचा अविभाज्य भाग बनत आहे.