
Agentic AI applications
esakal
‘एजंटिक एआय’ म्हणजे असे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान जे केवळ एकच बॉट किंवा साधन न वापरता अनेक वेगवेगळ्या एजंट्सची एक सुसंघटित टीम तयार करते. हे एजंट्स स्वतः विचार करू शकतात, शिकू शकतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकमेकांशी संवाद साधून एखादे काम पूर्ण करू शकतात. ‘एआय’मधील या नव्या संकल्पनेविषयी...
गेल्या काही वर्षांमध्ये चॅटबॉट्स, डिजिटल असिस्टंट्स, व्हॉइस बॉट्स आणि स्मार्ट सर्च इंजिन्स यांसारखी साधने आपल्याला दैनंदिन जीवनात मदत करत आली आहेत. पण या सर्व साधनांमध्ये एक मोठी मर्यादा होती. ही साधनं स्वतंत्रपणे काम करत असली तरी त्यांच्यात परस्पर संवादाची क्षमता नव्हती. म्हणजेच एक बॉट ग्राहकांशी बोलतो, पण दुसरा बॉट त्याच्याबरोबर मिळून योजना आखत नाही. त्यामुळे अनेकदा ही साधनं एकट्यानंच काम करतात आणि युजरला खऱ्या अर्थाने पूर्ण मदत मिळत नाही. याच ठिकाणी एजंटिक एआय ही नवी संकल्पना उपयोगी पडते. एकप्रकारे ‘एआय एजंट’ हा सेक्रेटरीसारखे काम करतो.