
AI and truth
esakal
विवेक सुतार
डेटा आणि एआयचा संगम हे ज्ञानाचे पतन नाही, तर सत्य कसे निर्माण होते, कसे तपासले जाते आणि त्याचे नियमन कसे होते, या प्रक्रियेतील ही एक उत्क्रांतीची झेप आहे. आपल्याला अशा नवीन संस्था आणि धोरणांची गरज आहे, जी ज्ञानाच्या स्थिरतेला जागतिक सार्वजनिक हित मानतील.
आ पल्या डोळ्यांसमोर एक अद्भूत क्रांती घडत आहे. डेटा, म्हणजे माहितीचा डोंगर, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजे विचार करणारी यंत्रणा, यांचा केवळ मिलाफ होत नाहीये, तर एक महासंगम घडतो आहे. या संगमातून एक अशी शक्ती जन्माला येत आहे, जी जुन्या जगाच्या सर्व सीमांना पुसून टाकत आहे. पूर्वी आपण कसं मानायचो?