
ब्रिजेश सिंह
Brijeshbsingh@gmail.com
आजकाल डीपफेकचा वापर केवळ प्रसिद्ध व्यक्तींना बदनाम करण्यासाठीच नाही, तर सामान्य माणसांनाही फसवण्यासाठी केला जात आहे. अशा धोक्यांपासून बचाव करायचा असेल तर सोशल मीडियावर किंवा इतर कोणत्याही माध्यमांवर दिसणाऱ्या माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका. माहिती विश्वसनीय स्रोतांकडून तपासून घ्या. डिजिटल मृगजळात, सत्य हेच आपलं सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. आपण ते जपलं पाहिजे.
तज्ज्ञांच्या मते, डीपफेकचा सामना करण्यासाठी एका बहुआयामी धोरणाची गरज आहे. लोकांना शिक्षित करणं महत्त्वाचं आहे. लोकांना गंभीर विचारसरणीचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. शाळा आणि कार्यस्थळांमध्ये लोकांना माहितीचा स्रोत तपासण्यास, दाव्यांची पडताळणी करण्यास आणि डिजिटल मॅनिप्युलेशन ओळखण्यास शिकवलं पाहिजे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान कंपन्या आणि सरकार यांच्यात सहकार्य वाढत आहे.