Premium| AI chatbot bias: एआय चॅटबॉट्सचा वापर, माहितीपेक्षा मतांना प्राधान्य

ChatGPT misinformation: स्टॅनफोर्ड आणि हार्वर्ड संशोधकांच्या मते, एआय चॅटबॉट्स वापरकर्त्यांच्या मताशी सहमत होण्याचा कल दाखवत आहेत. या प्रवृत्तीमुळे बौद्धिक क्षमतेवर आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो
AI chatbot bias

AI chatbot bias

esakal

Updated on

कोणतीही अडचण आली, एखादी शंका आली किंवा एखाद्या विषयावर सल्ला घ्यायचा असल्यास मित्र, सहकारी वा एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेण्याऐवजी अनेक जण एआय चॅटबॉट्सचा वापर वाढला आहे. एवढेच नव्हे, तर शाळेतील विद्यार्थीही त्यांचा गृहपाठ, प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी तसेच अभ्यासात शंका आल्यास शिक्षकांची मदत घेण्याऐवजी एआयची मदत घेतात. एआयवर सतत अवलंबून राहिल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांच्या बौद्धिक क्षमतेवरही परिणाम होत असल्याचे अनेक संशोधनात समोर आले. कृत्रिम बुद्धिमत्तेवरील लोकांचा वाढता वापर लक्षात घेता, लोक चॅटबॉट्सवर नेमक्या कोणत्या विषयांबाबत माहिती घेतात, कोणत्या विषयांवर चर्चा करतात, त्यांना नेमकी कोणती उत्तरे अपेक्षित आहेत, याचा अंदाज एआयलाही येत आहे. त्यामुळे वापरकर्त्याला नेमके अपेक्षित असलेले उत्तर देण्याचा ट्रेंड अलीकडे वाढल्याचे एका संशोधन अहवालातून पुढे आले आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि कार्नेगी मेलॉन विद्यापीठातील संशोधकांनी नुकताच ओपनएआय, गुगल जेमिनी, मेटा एआयसारख्या ११ विविध एआय लॅंग्वेज मॉडेल्सचा अभ्यास केला. त्यानुसार वापरकर्त्यांना अपेक्षित असलेल्या मुद्द्यांवर अधिक भर देण्याचा किंवा वापरकर्त्यांच्या मताशी सहमती दर्शवण्याचा कल वाढत आहे. एखाद्या विषयावर वापरकर्त्याचे मत नकारात्मक किंवा चुकीचे असले, तरी एआय चॅटबॉट्स त्यास सहमती दर्शवत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर हा ट्रेंड कायम राहिल्यास एखाद्या विषयावर माहिती शोधताना, त्या संदर्भातील उत्तर चुकीचे असले, तरी वापरकर्त्याचे मत त्या दृष्टीने सहमतीचे असल्यास त्याच पद्धतीने उत्तर दिले जाण्याची शक्यता वाढत जाणार आहे. त्यामुळे ज्या विषयावर मतभेद होऊ शकतात, त्याविषयांवरील उत्तरांवर अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. एआय चॅटबॉट्सची ही चाकोरीबद्ध सवय एकप्रकारे वापरकर्त्याच्या समाधानासाठी होय... होय... म्हणत राहील, अशी इशारावजा भीती संशोधकांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com