

Hollywood synthetic artist
esakal
टिली नॉरवूड ही हॉलीवूडची कोणी हाडामासाची मानवी अभिनेत्री नसून, पूर्णपणे ‘अल्गोरिदम’ने तयार केलेली एक कृत्रिम कलाकार आहे. ती केवळ एक ‘बातमी’ आहे... घराघरात पोहोचलेलं नाव नाही; पण स्वप्नं विकणाऱ्या या शहरांना आता ठरवायचं आहे, की हेच ते ‘नवीन’ स्वप्न आहे का जे त्यांना विकायचं आहे.
हॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेत टिली नॉरवूड नावाचं एक नवं वादळ उठलं आहे; पण गंमत म्हणजे, ही टिली कोणी हाडामासाची मानवी अभिनेत्री नसून, पूर्णपणे ‘अल्गोरिदम’ने तयार केलेली एक कृत्रिम (synthetic) कलाकार आहे. तिच्या या अकल्पनीय एंट्रीमुळे चित्रपटसृष्टी खडबडून जागी झाली आहे, जिथे मानवी कल्पकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्यात एक नवा संघर्ष पेटला आहे.