Premium|AI in Government : एआयमुळे बदलते सरकारी कार्यालयांचे रूप आणि कामकाज

Artificial Intelligence in Public Services : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सरकारी सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि अचूक होत आहेत. एस्टोनिया, सिंगापूरसारख्या देशांनी एआयच्या मदतीने प्रशासनात मोठी क्रांती घडवून कार्यक्षमतेचे नवे मापदंड निर्माण केले.
Artificial Intelligence in Public Services

Artificial Intelligence in Public Services

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर - saptrang@esakal.com

वीज आणि पाणीपुरवठा या खात्यांमध्ये एआयचा वापर प्रभावी ठरला. स्मार्ट मीटर्सच्या डेटावरून भविष्यात किती वीज लागेल, याचा अंदाज एआय लावतो. त्यामुळे विजेचं अनावश्यक उत्पादन टळलं. वीज चोरी किंवा अचानक वाढलेला विजेचा वापर एआय लगेच पकडतो. पण याविषयी काही वाद आहेत.

पूर्वी ‘सरकारी कार्यालय’ हा शब्द उच्चारला, की आपल्या डोळ्यांसमोर काय यायचं? धुळीनं माखलेल्या फायलींचे ढीग, लांबच लांब रांगा, लालफितीचा कारभार, कामाचा प्रचंड खोळंबा आणि टेबलाखालून चालणारे व्यवहार! पण आज हे चित्र वेगानं बदलत चाललंय. सरकारी खात्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ''एआय''चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर हा आता काही भविष्यातला किंवा सायन्स फिक्शन चित्रपटातला विषय राहिलेला नाही. तो आजच जगभरातल्या सरकारांच्या दैनंदिन कामाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. एआय, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ड्रोन्स आणि रोबोटिक्स या ''इंडस्ट्री ४.०'' च्या तंत्रज्ञानांमुळे आज जगभरातील सरकारं अधिक वेगवान, अचूक आणि कार्यक्षम बनली आहेत. जगभरातल्या शासकीय व्यवस्थेत एआयचा वापर किती वेगानं वाढतो आहे, याची कल्पना ''ओईसीडी'' (OECD) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या एका अभ्यासावरून येते. त्यांनी ११ वेगवेगळ्या देशांमधील तब्बल २०० सरकारी एआय प्रकल्पांचा बारकाईनं अभ्यास केला. त्यामध्ये सार्वजनिक सेवा, न्यायव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था, करप्रणाली, आपत्ती व्यवस्थापन आणि थेट मंत्रालयामधील प्रशासन अशा सर्वच क्षेत्रांमध्ये एआयनं आपला जम बसवला असल्याचं दिसून आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com