

AI at workplace
Esakal
मुंबई – आज आमच्या ऑफिसमध्ये मिटिंग झाली. इन्शूरन्सचं एक युनिट बंद झालं. आमच्यातल्या काही लोकांना घरी जायला सांगतलं तर काही लोकांना दुसऱ्या टीममध्ये शिफ्ट केलं. शिफ्ट केलेल्या लोकांमध्ये मी आहे. आज माझा नव्या टीममधला पहिला दिवस. आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि आता सांगितलं की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा आणि कामाला लागा. नोकरी जाईल ही तर भिती आधीपासूनच होती पण आता हे एआय कसं वापराचं, त्याचा खरोखरच मला काही उपयोग होतोय का? अशी भिती वाटून आज पहिल्याच दिवशी मला अक्षरश: गरगरत होतं.. नव्या गोष्टी, ट्रेनिंग, आकडे, कायदे डोळ्यासमोर फिरतायेत.. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरायला तयार आहे, शिकायचीही तयारी आहे तरी नाही जमलं तर काय अशी भिती वाटते आहे. पुण्यातील खराडी येथील आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या एका मध्यमवयीन पुरूषाने नाव न सांगण्याच्या अटीवर हे सांगितलं.
काहीच दिवसांपूर्वी Pew Research ने अमेरिकेत ५,२७३ नोकरदारांसोबत अभ्यास केला. या अभ्यासानुसार ५२% कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्यांवर 'एआय' चा काय परिणाम होईल याविषयी चिंता वाटते आहे. तर ३२% कर्मचाऱ्यांना असा विश्वास वाटतोय की, 'एआय'मुळे त्यांच्या रोजगाराच्या संधी कमी होतील. ६% कर्मचाऱ्यांच्या मते 'एआय'मुळे अधिक नोकऱ्या निर्माण होतील.
एआयमुळे नोकरी देणाऱ्यांपासून ते नोकरी करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच मनात संभ्रम आणि भिती आहे. ही असुरक्षितता एक व्यक्ती म्हणून कशी कमी करावी, संस्थात्मक पातळीवर हा विषय कसा हाताळावा, एआय वापरण्याबाबत मानसिकता कशी तयार करावी, संस्थेत एआय कल्चर रूजवताना कर्मचाऱ्यांची मानसिकता हा महत्वाचा विषय कसा हाताळावा याविषयी जाणून घेणार आहोत सकाळ+ च्या विशेष लेखातून..!